मित्र हो, काही दिवसांपूर्वी आमच्या मातुश्रींच्या मुखातून सादर केलेली प्रवचने आपण ऐकली असतील. मी त्यातील क्र. 27 - 9 हे ऑडिओ प्रवचन ऐकताना असे वाटले की त्यातील कथानकाचा भाग प्रत्यक्ष महाभारतात कुठे व कसा उपलब्ध आहे. त्यातील भाग सादर करताना त्यांनी किती संकलित करून सादर केला आहे वगैरे या उत्सुकतेने मी महाभारताचे मराठीतील अनुवाद शोधले. त्यापैकी एकातील काही भाग वाचकांना सदर करत आहे.
हाच भाग मी का निवडला?
श्रीकृष्णांच्या चरित्राचे वाचन करताना अनेक वेळा असा विचार मनांत येतो की श्रीकृष्णांना आपल्यादैवी सामर्थ्याने कौरव-पांडवाच्या युद्धामुळे होणाऱ्या मानवहानीला रोखता येणे शक्य असताना त्यांनी तसे का केले नाही? मग ते खरोखरच महामानव होते की फक्त त्यांच्यावर आत्यंतिक प्रेम आणि श्रद्धा भाव, भक्ती असल्यांकरिता ते दैवी शक्तींनी युक्त होते असे मानावे का?
श्रीकृष्णांच्या चरित्राचे वाचन करताना अनेक वेळा असा विचार मनांत येतो की श्रीकृष्णांना आपल्यादैवी सामर्थ्याने कौरव-पांडवाच्या युद्धामुळे होणाऱ्या मानवहानीला रोखता येणे शक्य असताना त्यांनी तसे का केले नाही? मग ते खरोखरच महामानव होते की फक्त त्यांच्यावर आत्यंतिक प्रेम आणि श्रद्धा भाव, भक्ती असल्यांकरिता ते दैवी शक्तींनी युक्त होते असे मानावे का?
या पार्श्वभूमीवर उत्तर अनेकदा अनेकांनी दिलेले स्पष्टीकरण माझ्या वाचनात आहे, परंतु या भागात श्रीकृष्ण स्वतः अशा प्रश्नाला कसे सामोरे गेले होते.
या शिवाय द्वारकेला परतल्यावर बहीण सुभद्रेला तिच्या मुलगा - सुनेचा पती अभिमन्यू गेल्याची वार्ता सांगायचा, प्रत्यक्ष श्रीकृष्ण आपल्या मुखाने रणांगणात एक एक वीरांनी कसा पराक्रम केला आणि वीरगतीला प्राप्त झाले ते वडील वसुदेव आणि इतरांना समोर बसवून कथन करतात.
असा सहसा ऐकायला किंवा माहिती नसलेला कथाभाग असल्याने माझी उत्सुकता वाढली. असो.
श्रीकृष्ण कौरव पांडवांत सलोखा व्हावा. युद्ध टळावे यासाठी वाटाघाटी करायला द्वारकेहून हस्तिनापुरला जाताना वाटेत (राजस्तान?) मरू प्रदेशातील उत्तंक नामक ऋषींच्या आश्रमात भेटी घेतली. 'तू प्रत्यक्ष परब्रह्म परमात्मा आहेस. तेव्हा तुला हे काम मुळीच अवघड नाही. मला खात्री आहे की तू या वाटाघाटीत यशस्वी होशील' वगैरे ते श्रीकृष्णांनी उददेशून म्हणाले होते. आता श्रीकृष्ण आपली बहीण सुभद्रेबरोबर द्वारकेला परत जात असताना वाटेत त्याच उत्तंक ऋषींच्या आश्रमात भेटतात. त्यावेळच्या चर्चेत श्रीकृष्ण युद्ध थांबवायला अयशस्वी ठरल्याचे ऐकून भडकले. 'म्हणजे तू साक्षात परमात्मा आहेस यावरचा माझा विश्वास आता उडाला आहे' वगैरे बोलून निर्भत्सना केली, नव्हे त्यांना शाप द्यावा असा मनांत विचार आला!'....
यावर श्रीकृष्णांचे काय उत्तर होेते? ज्या उत्तंक ऋषींना ते सांगितले गेले, ते त्यांना पटले का? त्यांच्या पुर्वचरित्रातील काही कर्मांचा त्यांच्या वागण्यावर प्रभाव होता? वगैरे मंगला हत्याकांड कथनातून संकलितपणे सांगितले गेले आहे. ते आपण ऐकावे अशी विनंती करतो. त्यातील कथेचे संपूर्ण वर्णन मराठीतील अनुवादात कसे आहे ते ही वाचायला मिळणे इच्छुकांना रंजक वाटेल म्हणून पुढील भागात सादर...
यापुढील कथनातील भाग 27 -9 सांगताना मंगला ओक यांनी
द्वारकेतील आपल्या परिवाराला महायुद्धाची वार्ता कशी सांगितली....अभिमन्युच्या मृत्युच्या वार्तेचा परिणाम सुभद्रेला एक माता म्हणून व उत्तरेला पत्नी म्हणून कसा वेगवेगळा झाला याचे वर्णन केले आहे. ते प्रत्यक्ष महाभारत ग्रंथात कसे येते याची एक झलक...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा