व्यक्ती परिचय
गेल्या 50 वर्षांपेक्षा जास्त काळात मंगला ओक रामायण, श्रीमद भागवत, गीता, गुरूचरित्र, आदि महान ग्रंथांच्या, महानायकांच्या व भारतीय संत चरित्रांच्या अभ्यासक आहेत. अध्यात्मशास्त्राचा गाभा - भक्ती मार्ग सामान्य जनांना आपल्या गोड आवाजात, सुंदर चालीत, ओघवत्या भावपूर्ण रसाळ वाणीने, सोप्या-साध्या भाषेतून कथन करण्याची त्यांची हातोटी विलक्षण आहे. यामुळे त्यांच्या कीर्तनाचे प्रवचनांचे कार्यक्रम अत्यंत रंगतात. 'कीर्तनभूषण' या पदवीने त्यांना पुर्वी सन्मानित केले गेले आहे. वयमानप्ररत्वे त्या बसून कार्यक्रम करतात.
स्व. पती जनार्दन ओक यांच्या प्रोत्साहनामुळे एक हौशी स्त्री कीर्तनकार म्हणून त्यांनी सुरवात केली. अनेक ज्ञानीजनांच्या विशेषतः कै. कमाताई वैद्यांच्या मार्गदर्शनातून अनेक श्रोत्यांना आपापल्या जीवनात अध्यात्मिक आनंद मिळवायची प्रेरणा त्यांच्या प्रवचन-कीर्तनातून मिळाली.
मराठवाड्यातील परांडा, अशा अगदी खेड्यातील मंदिरांपासून ते माधवनगर, सांगली, मिरज, इचलकरंजी, पुणे-मुंबई आदी अनेक शहरातील मोठ्या सभास्थानी त्यांनी आपले कला गुण दाखवून चाहत्यांची मने शांत केली आहेत. मुख्यतः त्याचा स्त्री श्रोता वर्ग खूप मोठ्या प्रमाणात दक्षिण महाराष्ट्रात व गोव्यात आहे. अनेक विद्वानांनी त्यांच्या कथा-कीर्तनाची प्रशंसा केली आहे. चिन्मय मिशनच्या पुज्य तेजोमयानंदांनी व सुप्रसिद्ध संतवाङ्मय अभ्यासक पुज्य कै. कमाताई वैद्य आदींच्या कृपाशीर्वादाने त्या पुनीत झाल्या आहेत.
महाभारतातील युद्धानंतरच्या शांततेच्या काळातील महाभारतातील पर्वातील कथानक हाताळताना भीष्म - धर्मराज याच्यातील चर्चेतून व्यक्तिचे, जनसमुहाचे, समाजाचे, राष्ट्राचे, तसेच सत्ताधाऱ्यांचे, गुरूजनांचे, राजाचे व समाजपुरुषाचे कर्तव्य कर्म काय याची ओळख विविध गोष्टींच्या मधून व परस्पर चर्चेतून केलेली आहे. हा कथा भाग ऐकणाऱ्यांना विशेष आनंद देऊन जाईल यात संशय नाही.
आधी इस्लामपुर, नंतर माधवनगर, जयसिंगपुर, सांगली व सध्या पुण्याच्या पुर्वभागातील खराडी येथील पद्मश्री बेहेरे वृद्धनिवासात राहून त्या आपल्या अध्यात्मिक साधनेतून आत्मिक आनंद अनुभवत आल्या आहेत.
दि. 22 ऑगस्ट 2014 रोजी वृद्धापकाळाने त्यांचे देहावसान झाले.
संपर्क पत्ता - मंगला ओक
c/o शशिकांत ओक.
ए - 4 /404 गंगा हॅमलेट हौ. सो. विमान नगर, पुणे. 411014.
मो. क्रमांक -